*सहकाऱ्यांच्या आनंदातला आनंदी माणूस
माझे सहकारी व जिवलग मित्र शिवाजी पाटील यांना महाराष्ट्र राज्य शासन क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला .
लिहितोय खरं पण सरांना आवडेल का ...आपली स्तुती केलेली . लिहावचं डोक्यातले विचार मांडावेत . म्हणून लिहितोय ...
संस्थाप्रमुख या नात्याने आम्ही सकाळी सात वाजता सरांना भेटण्यास गेलो . ( न सांगता) पाहता क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व भावना मला स्पष्ट जाणवत होत्या .
आदर्श विद्यानिकेतन ला राज्य पुरस्काराचा दुहेरी मुकुट मिळण्याचे काम तुम्ही दोघांनी केला आहे .
( कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली शाळा )
सर आपल्यामुळेच ... असे म्हणताच ... मुळीच नाही आपले कष्टाची आणि कार्याची पोच पावती आहे . ... हार्दिक अभिनंदन पाटील सर आणि शेटे सर
अशी भावना लगेचच व्यक्त केली ...
जणू हा पुरस्कार आपल्यालाच मिळाला आहे अशी भावना सरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती .
शैक्षणिक गप्पा सुरू असताना गरमागरम मसाले दूध आणि बिस्कीटांचा आस्वाद घेतला . ( स्वतः घुगरे मॅडमनी बनवलेलं होतं ) घुगरे कुटुंबच आमच्या या आनंदात सहभागी झाल होत.
स्वतःच्या हाताने स्वतःचेच पेढे भरवून आमच्या या यशाला त्यांनी कृतीतून दाद दिली आणि आमच्या या यशाला आनंदाची झालर लागली ...
एवढंच वाटलं,
सहकाऱ्यांच्या आनंदातला आनंदी माणूस
आदर्श शिक्षण समूह मिणचे
संस्थापक अध्यक्ष प्राचार्य
*डॉ . डी . एस . घुगरे*
( माजी चेअरमन व विद्यमान संचालक कोजिमाशी पतसंस्था कोल्हापूर )
सर ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना आवश्यक भेटा हं . यश आपल नसतंच ... त्याला अनेकांचे हात असतात . . . याची आठवण करत आमच्या तिघांचा (मी ,शिवाजी पाटील चंद्रकांत बागणे )प्रवास शाळेच्या दिशेने सुरू असताना अनेकांच्या हातांची यादी आठवत होतो .
सरांचे वैचारिक व कृतीला सलाम
डॉ . दिपक शेटे
महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2021 -22
No comments:
Post a Comment